घरक्रीडाअंबाती रायडूने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

अंबाती रायडूने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायडूने क्रिकेटमधली आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंतला संघात स्थान दिले गेले. मात्र, अंबातीला त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असूनही संधी मिळाली नाही, म्हणून अंबाती रायडू नाराज आहे. त्यामुळे रायडूनने आंतरराराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामन्यांमधूनही निवृत्ती घेतली असल्याचे म्हटले जात आहे. निवृत्ती संदर्भात त्याने बीसीसीआयला पत्र पाठवले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

विश्वचषक स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे धवनच्या बोटाचे ऑपरेशन करावे लागले होते. दरम्यान, धवनच्या ऐवजी विजय शंकरला संघात स्थान दिले गेले. परंतु, विजय शंकरला पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे मयांक आग्रवाल आणि ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली. ऋषभ पंतच्या तुलनेने अंबाती रायडूकडे अनुभव जास्त आहे. तरीदेखील त्याला संघात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे अंबाती रायडू नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. या नाराजीतूनच अंबाती रायडूने निवृत्तीचे पत्र बीसीसीआयला पाठवल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -