घरमहाराष्ट्रतिवरे धरण दुर्घटना : 'सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा!'

तिवरे धरण दुर्घटना : ‘सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा!’

Subscribe

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू हे सरकारच्या निष्क्रियतेचे बळी असून दोषींवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गांधीभवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना वडेट्टीवार म्हणाले की, हे  धरण बांधून फक्त १९ वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटते कसे?, असा प्रश्न उपस्थित करुन या धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. या धरणाचे काम स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले आहे. त्यामुळे दुर्घटनेला ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करुन या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

तिवरे धरण फुटल्याने १३ घरे वाहून गेली आहेत तर आतापर्यंत १० मृतदेह मिळाले असून अजून १८ जण बेपत्ता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या घटनेतील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून ते पुढे म्हणाले की, या धरणाला गळती लागली असल्याची तक्रार स्थानिक लोकांनी जलसंपदा खात्याकडे केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्याची डागडुजी केली असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे. डागडुजी करूनही धरण फुटलेच कसे, असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सरकारने राज्यातील सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अशी मागणीही विरोधी पक्ष नेत्यांनी केली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे उपस्थित होते.

- Advertisement -

नवाब मलिक यांनीही केली मागणी 

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. तिवरे धरणाच्या दुर्घटनेवर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या धरणाच्या लिकेजबाबत स्थानिक लोकांनी आमदार, खासदार आणि संबंधित अधिकार्‍यांना कल्पना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेला दोषी अधिकारी व आमदार, खासदार यांना जबाबदार धरण्यात यावे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत युती सरकारवर सडकून टिका केली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 

काय आहे घटना 

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेली. या घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले असून ९ जणांचे मृतदेह सापडले आहेतमंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीया घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेसध्या एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -