घरक्रीडागेल, रसेल, ब्राव्हो! आगामी मालिकांसाठी विंडीजच्या विस्फोटक टी-२० संघाची घोषणा

गेल, रसेल, ब्राव्हो! आगामी मालिकांसाठी विंडीजच्या विस्फोटक टी-२० संघाची घोषणा

Subscribe

पोलार्डचे विंडीजचे कर्णधारपद भूषवणार आहे. 

वेस्ट इंडिजने आगामी तीन टी-२० मालिकांसाठी आपल्या १८ सदस्यीय प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप होणार असून गतविजेत्या विंडीजला जेतेपद राखण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. या वर्ल्डकपच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध होणाऱ्या विंडीजच्या आगामी टी-२० मालिकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या तिन्ही मालिकांसाठी विंडीजने सर्व प्रमुख खेळाडूंची निवड केली आहे. विस्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल, तसेच ड्वेन ब्राव्हो यांचे विंडीजच्या संघात पुनरागमन झाले आहे. कर्णधार किरॉन पोलार्ड आणि अनुभवी सलामीवीर क्रिस गेलचाही या संघात समावेश आहे. विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेला २६ जूनपासून सुरुवात होईल.

रसेलचे संघात पुनरागमन

रसेलने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च २०२० मध्ये खेळला होता. परंतु, त्यानंतर तो विंडीज, श्रीलंका आणि भारतातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याचे विंडीज संघात पुनरागमन झाले आहे.

- Advertisement -

शिमरॉन हेटमायरही स्थान  

आगामी तिन्ही टी-२० मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आम्ही अनुभवी वर्ल्ड-क्लास आणि मॅचविनर खेळाडूंसह प्रतिभावान खेळाडूंची संघात निवड केली आहे, असे विंडीजचे प्रशिक्षक फील सिमन्स म्हणाले. रसेलप्रमाणेच डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर, वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आणि ओशेन थॉमस, तसेच फिरकीपटू हेडन वॉल्श ज्युनियर यांनाही विंडीजच्या संघात पुन्हा स्थान मिळाले आहे.

वेस्ट इंडिज टी-२० संघ: किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्षक/उपकर्णधार), फॅबियन अ‍ॅलन, ड्वेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, फिडेल एडवर्ड्स, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल हुसेन, ओबेड मकॉय, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, ओशॅन थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -