घरक्रीडाअनुष्काचा अनादर करायचा हेतू नव्हता!

अनुष्काचा अनादर करायचा हेतू नव्हता!

Subscribe

 फारुख इंजिनियरांचे स्पष्टीकरण

भारताचे निवडकर्ते यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचकदरम्यान कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला चहा द्यायचे काम करत होते, असे विधान भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारुख इंजिनियर यांनी गुरुवारी केले होते. मात्र, या आरोपांमध्ये जराही तथ्य नाही, असे अनुष्का सोशल मीडियावर म्हणाली. तसेच तुम्हाला जर निवड समितीवर टीका करायची असेल तर नक्कीच करा, पण उगाचच माझ्या नावाचा वापर करू नका, असेही तिने सांगितले. यानंतर इंजिनियर यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माझा अनुष्काचा अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.

मी बोलण्याच्या ओघात ती गोष्ट बोलून गेलो आणि तुम्ही त्यातून राईचा पर्वत केलात. उगाचच अनुष्काचे नाव त्यात ओढले गेले. अनुष्का खूप चांगली मुलगी आहे. विराट कोहली हा उत्कृष्ट कर्णधार आहे आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीही चांगली कामगिरी करत आहेत. हे प्रकरण उगाचच वाढवले गेले असे मला वाटते, असे इंजिनियर म्हणाले.

- Advertisement -

वयाच्या ८२व्या वर्षी ‘त्यांनी’ प्रगल्भता दाखवावी- प्रसाद

फारुख इंजिनियर यांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली. त्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी इंजिनियर यांना चांगलेच सुनावले. प्रसाद म्हणाले, एखाद्या व्यक्तीला निवड समिती सदस्य आणि भारतीय कर्णधाराच्या पत्नीविषयी अपमानजनक वक्तव्य करून आनंद मिळतो, याचे मला वाईट वाटते. निवड समितीची नेमणूक बीसीसीआयने योग्य प्रक्रिया पूर्ण करूनच केली आहे हे विसरू नका. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी वैचारिक प्रगल्भता दाखवावी आणि भारतीय क्रिकेटच्या यशाचा आनंद घ्यावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -