घरक्रीडाअॅरॉन फिंचने केली टी-२० सामन्यात विक्रमी धावसंख्या

अॅरॉन फिंचने केली टी-२० सामन्यात विक्रमी धावसंख्या

Subscribe

विशेष म्हणजे इतकी अप्रतिम खेळी केल्यानंतर अॅरॉन हिट-विकेट आऊट झाला असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

‘क्वांटस टूर ऑफ झिम्बाब्वे‘ या तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरूद्ध झिम्बाब्वे ही मॅच सध्या सुरू आहे. आज होत असलेल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरॉन फिंचने ७६ चेंडूत १७२ धावा करत टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या गाठली. विशेष म्हणजे इतकी अप्रतिम खेळी केल्यानंतर अॅरॉन हिट-विकेट देऊन आऊट झाला असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

झिम्बाब्वेमध्ये क्वांटस टूर ऑफ झिम्बाब्वे ही तिरंगी मालिका सुरू आहे. ज्यात झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ सामिल आहेत. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरूद्ध झिम्बाब्वे हा तिसरा सामना आज होत आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत झिम्बाब्वेपुढे २३० धावांचे आव्हान ठेवले आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि सलामीवीर अॅरॉन फिंच सिंहाचा वाटा दाखवत तब्बल १७२ धावा केल्या आहेत. अॅरॉन फिंचने झिम्बाब्वेच्या बॉलर्सना अक्षरश: धुत अवघ्या ७६ बॉल्समध्ये १६ फोर्स आणि १० सिक्ससह १७२ रनांचा डोंगर रचला आहे. फिंचने ही धावसंख्या २२६ च्या स्ट्राईकरेटने केली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च भागिदारीचाही विक्रम

ऑस्ट्रेलियन सलामीवीर अॅरॉन फिंच आणि डी आरसी शॉर्ट या सलामी-जोडीनी तब्बल २२३ धावांची भागीदारी रचली आहे. ही टी २० क्रिकेटमधील पहिलीच २०० धावांची भागीदारी आहे. ज्यात डी आरसी शॉर्टने ४६ तर अॅरॉन फिंचने १६९ धावांचे योगदान केले आहे. ही भागीदारी शेवटच्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेच्या मुजारबानी याने तोडली असून त्याने तिसऱ्या चेंडूवर शॉर्टचा विकेट घेतला तर त्या पाठोपाठ चौथ्या चेंडूवर फिंच हिट-विकेट बाद झाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -