घरक्रीडाअभिषेक-ज्योतीची सुवर्ण कमाई

अभिषेक-ज्योतीची सुवर्ण कमाई

Subscribe

आशियाई तिरंदाजी स्पर्धा

अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेण्णम या जोडीने आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे एकमेव सुवर्णपदक पटकावले. भारताच्या तिरंदाजांनी या स्पर्धेत एकूण सात पदके जिंकली. वर्मा आणि वेण्णम यांनी कम्पाउंड मिश्र दुहेरी प्रकारात चिनी तैपेईच्या यि-हसून चेन आणि चिह-लू चेन या जोडीवर १५८-१५१ अशी मात करत सुवर्णपदक मिळवले.

हे भारताचे या स्पर्धेतील एकमेव सुवर्णपदक ठरले. याव्यतिरिक्त भारतीय नेमबाजांनी दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली. मात्र, ही पदके भारताच्या खात्यात जमा गेली नाहीत. जागतिक तिरंदाजी संघटनेने काही महिन्यांपूर्वी भारतीय तिरंदाजी संघावर बंदी घातल्याने भारताचे तिरंदाज या स्पर्धेत जागतिक तिरंदाजी ध्वजाखाली खेळले. या स्पर्धेची बुधवारी सांगता झाली.

- Advertisement -

त्याआधी कम्पाउंड सांघिक प्रकारात भारतीय तिरंदाजांचे सुवर्णपदक अवघ्या एका गुणाने हुकले. या संघात अभिषेक वर्माचाही समावेश होता. सुवर्णपदकासाठी झालेली लढत कोरियाने २३३-२३२ अशी एका अवघ्या गुणाच्या फरकाने जिंकली. मात्र, मिश्र दुहेरीत अभिषेकने ज्योतीच्या साथीने खेळताना सुवर्णपदक जिंकण्यात चूक केली नाही. हे पदक मिळवल्यानंतर वर्मा म्हणाला, या लढतीदरम्यान खूप हवा सुरु होती आणि सुवर्णपदक मिळवण्याची ही आमच्यासाठी अखेरची संधी होती. आम्ही या संधीचे सोने केल्याचा आनंद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -