घरक्रीडाश्रीकांतची विजयी सलामी

श्रीकांतची विजयी सलामी

Subscribe

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तिसर्‍या सीडेड श्रीकांतने रशियाच्या व्लादमीर मालकोव्हचा २१-१२, २१-११ असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचा दुसर्‍या फेरीत भारताच्याच पारुपल्ली कश्यपशी सामना होणार आहे.

फ्रांसच्या ल्युकास कॉर्वीने माघार घेतल्यामुळे कश्यपने थेट दुसरी फेरी गाठली. तसेच मागील आठवड्यात स्कॉटिश ओपन जिंकणार्‍या १८ वर्षीय लक्ष्य सेननेही थेट दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. त्याचा पहिल्या फेरीत फ्रांसच्या थॉमस रुक्सेलशी सामना होणार होता, पण रुक्सेलनेही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

पुरुष एकेरीतील पहिल्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतने सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला. त्यामुळे त्याने पहिला गेम ९, तर दुसरा गेम १० गुणांनी जिंकत या स्पर्धेत आगेकूच केली. महिला एकेरीत भारताच्या अस्मिता चलिहाने भारताच्याच वृषाली गुम्मडीवर २१-१६, २१-१६ अशी मात करत दुसरी फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -