घरक्रीडाकुल्टर नाइलने विडींजला धुतले; ऑस्ट्रेलियाला तारले

कुल्टर नाइलने विडींजला धुतले; ऑस्ट्रेलियाला तारले

Subscribe

वर्ल्ड कपचा १० वा सामना आज नॉटिंघम येथे खेळला जात आहे. विंडीजने टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. कॅप्टन जेसन होल्डरचा निर्णय सार्थ ठरवत विडींजच्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियाच्या एकापाठोपाठ एक विकेट्स काढल्या. ऑस्ट्रेलियाच्या ३० ओव्हरनंतर १४७ धावांवर सहा विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे ते २५० च्या वर स्कोअर करू शकतील का? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आठव्या विकेटसाठी खेळायला आलेल्या बॉलर नेथन कुल्टर नाईलने विडींजच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली.

नेथन कुल्टर नाईलने ६० बॉलमध्ये ४ षटकार आणि ८ चौकार मारून ९२ रन्स केल्या. मात्र अतिशय थोड्या फरकाने त्याचे शतक हुकले. तरिही त्याने आपल्या संघाला २८८ रन्सच्या टप्प्यापर्यंत आणून ठेवले होते. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती. १५ रन्सवर फिंचला आपली विकेट गमवावी लागली होती. त्यानंतर चौथ्या ओव्हरला कॉट्रेलने डेव्हिड वॉर्नरलाही माघारी धाडले. स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स करी वगळता मिडल ऑर्डरसुद्धा फ्लॉप झाली.

- Advertisement -

आठ नंबरवर खेळताना सर्वाधिक स्कोअर करणारा कुल्टर नाईल दुसरा बॅट्समन ठरला आहे. दुसऱ्या क्रमाकांवर विडींजचा आंद्रे रसलदेखील आहे. रसलने २०११ साली भारतविरुद्ध खेळताना नाबाद ९२ धावा केल्या होत्या. प्रथम स्थानी इंग्लडचा क्रिस वोक्स आहे. त्याने २०१६ साली नॉटिंघमच्याच मैदानात श्रीलंकेविरोधात नाबाद ९५ धावा केल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -