घरक्रीडाराष्ट्रकूल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतीय महिला संघाचा पराभव

राष्ट्रकूल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतीय महिला संघाचा पराभव

Subscribe

२२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरूवात थाटामाटात झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. परंतु, अखेरच्या क्षणी भारताने हज जिंकणारा सामना गमवला.

२२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरूवात थाटामाटात झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले. परंतु, अखेरच्या क्षणी भारताने हज जिंकणारा सामना गमवला. ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेघ गार्डनरने ३५ चेंडूंत नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच, भारतावर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. (Australia Beat Indian Women Cricket Team By 3 Wickets In Commonwealth Games 2022)

या सामन्यात गोलंदाजीवेळी भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने चेंडूचा भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला चार धक्के दिले. दरम्यान, यासामन्यात, भारताने या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर शेफाली वर्माने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे भारताला या सामन्यात चांगली सुरुवात करता आली. शेफालीने ३३ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ४८ धावांची दमदार खेळी साकारली.

- Advertisement -

शेफाली बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाचा डाव सावरला. तसेच, हरमनप्रीत कौरने धडाकेबाज फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघालाही १५० धावांचा टप्पा गाठून दिला. कौरने यावेळी ३४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. कौरच्या या ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या.

भारताच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्के बसत गेले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार फलंदाजांना यावेळी रेणुका ठाकूरने स्वस्तात बाद केले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या संघाची अवस्था ही ४ बाद ३४ अशी झाली होती. रेणुकाने यावेळी चार षटकांमध्ये १८ धावा देत चार विकेट्स मिळवले आणि ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.

- Advertisement -

परंतु, अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाची गार्डनर आणि हॅरिस यांनी उत्तम भागिदारी केली. भारताच्या मेघना सिंगने ग्रेस हॅरिसला ३७ धावांवर बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची अॅशलेघ गार्डनर ही अखेरच्या षटकांमध्ये खेळपट्टीवर उभी होती आणि ऑस्ट्रेलियाला विजयाची आशा तिच्याकडूनच होती व तिनेच अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -