घरक्रीडालायनमुळे ऑस्ट्रेलिया फ्रंटफूटवर

लायनमुळे ऑस्ट्रेलिया फ्रंटफूटवर

Subscribe

४५४ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडच्या २५१ धावा

ऑफस्पिनर नेथन लायनच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावा केल्या, ज्याचे उत्तर देताना न्यूझीलंडचा डाव २५१ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २०३ धावांची आघाडी मिळाली. लायनने ६८ धावांच्या मोबदल्यात न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. ऑस्ट्रेलियाची तिसर्‍या दिवसअखेर दुसर्‍या डावात बिनबाद ४० अशी धावसंख्या होती. डेविड वॉर्नर २३, तर जो बर्न्स १६ धावांवर खेळत होते.

त्याआधी तिसर्‍या दिवशी बिनबाद ६३ वरून पुढे खेळताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. लायनने टॉम ब्लंडेलचा (३४) त्रिफळा उडवत न्यूझीलंडला पहिला झटका दिला. जीत रवाल आणि कर्णधार टॉम लेथम यांनी काही संयमाने फलंदाजी केली. मात्र, लायनने रवालला (३१), तर पॅट कमिन्सने लेथमला (४९) माघारी पाठवले. यानंतरही न्यूझीलंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या.

- Advertisement -

पदार्पण करणार्‍या ग्लेन फिलिप्सला २ आणि १७ धावांवर असताना लायनने जीवदान दिले. याचा फायदा घेत त्याने ११३ चेंडूत कसोटीतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, ५२ धावांवर कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवला. पुढे कॉलिन डी ग्रँडहोम (२०) आणि टॉड अ‍ॅष्टल (२५) वगळता इतरांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. लायनने तळाच्या तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर संपुष्टात आणला.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया : ४५४ आणि बिनबाद ४० (डेविड वॉर्नर नाबाद २३, जो बर्न्स नाबाद १६) वि. न्यूझीलंड : सर्वबाद २५१ (ग्लेन फिलिप्स ५२, टॉम लेथम ४९; नेथन लायन ५/६८, पॅट कमिन्स ३/४४).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -