घरक्रीडाबॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अडकली तमिळ अभिनेत्याशी विवाहबंधनात! पहा फोटो

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अडकली तमिळ अभिनेत्याशी विवाहबंधनात! पहा फोटो

Subscribe

विवाहसोहळा आणि त्याआधीच्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

भारताची चॅम्पियन बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि तमिळ अभिनेता विष्णू विशाल हे गुरुवारी विवाहबंधनात अडकले. हा विवाहसोहळा हैदराबाद येथे संपन्न झाला. देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विवाहसोहळ्यांवरही विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे ज्वाला आणि विष्णू विशाल यांनी रजिस्टर लग्न केले. यावेळी केवळ कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींना प्रवेश देण्यात आला होता. ज्वाला आणि विष्णू हे गुरुवारी विवाहबंधनात अडकले असले तरी त्याआधी हळदीसारखे विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हळदीच्या वेळी ज्वालाने पिवळ्या साडी नेसली होती. तिच्यावर सर्व मित्रमंडळींनी आणि कुटुंबीयांनी हळदीचे पाणी टाकले. त्यानंतर ज्वाला आणि विष्णू विशाल यांनी रजिस्टर लग्न केले. या दोघांनी विवाहबंधनात अडकल्यावर जवळच्या मित्रमंडळींसाठी खास पार्टीचेही आयोजन केले होते. सध्या कोरोनाच्या काळात विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. लग्नाला फार लोकांना एकत्र जमण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे ज्वाला आणि विष्णू विशाल यांनी सर्व कार्यक्रम एकाच दिवशी करण्याचे ठरवल्याचे त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -