घरक्रीडाBall Tampering Scandal : कॅमरून बँक्रॉफ्टच्या खुलाशानंतर ऑस्ट्रेलियन बोर्डाने केला संपर्क

Ball Tampering Scandal : कॅमरून बँक्रॉफ्टच्या खुलाशानंतर ऑस्ट्रेलियन बोर्डाने केला संपर्क

Subscribe

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही चेंडूशी छेडछाड केली जात आहे याची कल्पना होती, असे बँक्रॉफ्ट म्हणाला होता.

केप टाऊन येथे २०१८ साली झालेले बॉल टॅम्परिंग प्रकरण खूप गाजले होते. स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरुन बँक्रॉफ्ट या ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंवर या प्रकरणातील सहभागामुळे बंदी घालण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत बँक्रॉफ्टने सँडपेपरचा तुकडा वापरत चेंडूशी छेडछाड केली होती. त्यावेळी बँक्रॉफ्टसह केवळ कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांनाच याबाबत माहिती असल्याचे समोर आले होते. मात्र, बँक्रॉफ्टने काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही चेंडूशी छेडछाड केली जात आहे याची कल्पना होती, असे बँक्रॉफ्ट म्हणाला होता. त्याच्या या खुलाशानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला संपर्क केला आहे.

बँक्रॉफ्टने केला होता खुलासा 

२०१८ बॉल टॅम्परिंग प्रकरणाची चौकशी झाल्यावर बँक्रॉफ्ट, स्मिथ आणि वॉर्नर या तिघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेंडू हाताळत होते. त्यामुळे त्यांना चेंडूसोबत काही तरी केले जात आहे, याची कल्पना असणार हे वेगळे सांगायला नको, असे बँक्रॉफ्ट काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला. त्याच्या या खुलाशानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला संपर्क केल्याचे राष्ट्रीय संघांचे कार्यकारी महाप्रबंधक बेन ऑलिव्हर यांनी सांगितले.

- Advertisement -

नवी माहिती असल्यास आम्हाला द्यावी

बॉल टॅम्परिंग प्रकरणाची पूर्ण चौकशी झाली होती. मात्र, कोणाकडे नवी माहिती असल्यास त्यांनी आम्हाला संपर्क करावा. आम्ही या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी तयार आहोत, असे सांगितले होते. बँक्रॉफ्टने काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर आम्ही त्याच्याशी संपर्क केला. त्याच्याकडे नवी किंवा वेगळी माहिती असल्यास त्यांनी ती आम्हाला द्यावी असे आम्ही त्याला सांगितले, असेऑलिव्हर म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -