घरक्रीडापुनरागमन कधी ? माहित नाही

पुनरागमन कधी ? माहित नाही

Subscribe

स्पोर्ट हर्नियामुळे भुवनेश्वर कुमारच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंना दुखापतीने ग्रासले आहे.त्यात वेगवान गोलंदाजांना तर दुखापतीची जास्त भिती असते.त्यानंतर अशा दुखापतींतून बाहेर पडण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते.भारतीय संघाचा आघाडीचे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची स्थितीही काहीशी अशीच झाली आहे. सध्याच्या घडीला दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार हा संघापासून बाहेर आहे. भुवनेश्वर पुनरागमन नेमके केव्हा करणार याची चर्चा होती. परंतु,आता भुवनेश्वरने मौन सोडले असून आपल्या दुखापतीबाबत भुवनेश्वर म्हणाला की, ” दुखापतीमुळे मी संघाबाहेर होतो. त्यावेळी एक चाचणी करताना मला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचे समजले. त्यामुळे आता यावर मला उपचार घ्यावे लागणार आहेत. यासाठी साधारणत: शस्त्रक्रीया केली जाते. जर माझ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली तर मी किती दिवस मैदानात उतरू शकणार नाही, हेदेखील मला माहिती नाही,असे त्याने म्हटले आहे.

तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अजून काही महिने बाकी आहेत. पण माझ्या डोक्यात या विश्वचषकाचा विचार नक्कीच नाही. माझ्याबाबत बीसीसीआय आणि निवड समिती जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल,असे भुवनेश्वर कुमारने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरची एक चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्याला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचे म्हटले गेले होते. आता त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.भुवनेश्वरच्या उपचारांमध्ये दिरंगाई केल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -