घरक्रीडाBWF World Tour Finals: पी व्ही सिंधूची वर्ल्ड टूर फायलनलच्या अंतिम फेरीत...

BWF World Tour Finals: पी व्ही सिंधूची वर्ल्ड टूर फायलनलच्या अंतिम फेरीत धडक

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटन पटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता पी व्ही सिंधू जपानच्या अकाने यामागुचीविरोधात रोमहर्षक विजय मिळवला आहे. पी व्ही सिंधूने वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली आहे. आतापर्यंत सिंधू या स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे. यापुर्वी २०१८ रोजी हा किताब जिंकला होता आणि अंतिम फेरीत पोहचणारी सिंधू प्रथम भारतीय खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधूने तिसऱ्या क्रमांकाच्या जपानच्या खेळाडूविरोधात १२-८ असा रिकॉर्ड होता. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यावर सिंधू फ्रेंच ओपन, इंडोनेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया ओपनविरोधात सेमी फायनलपर्यंत पोहचली होती. सिंधू मार्चमध्ये ओपन फायनलमध्ये पराभूत झाली होती.

सिंधूने एक तास १० मिनिटाच्या सामन्यात उपांत्यफेरीत यामागुचीला २१-१५, १५-२१, २१-१९ अशा फरकाने पराभूत केलं आहे. सिंधूला अंतिम फेरीत कोरियाच्या एएन सियंगसोबत सामना होणार आहे. सिंधूने पहिला राऊंड २१-१५ ने जिंकला तर दुसरा १५-२१ ने गमावला होता. यानंतर सिंधू १५-१२ अशा फरकाने पुढे होती यावेळी तिने २ ने आघाडी घेत १७-१२ ची आघाडी केली.

- Advertisement -

जपानच्या खेळाडूने पुनरागमन करताना ५ गुण मिळवले आणि १७-१७ अशी बरोबरी केली. सिंधूने पुन्हा १८-१७ची आघाडी घेतली परंतु यामागुचीने पुन्हा गुण मिळवत बरोबरी केली परंतु सिधूने पुन्हा खेळी करत १९-१८ असा फरक केला. परंतु यानंतर पुन्हा बरोबरी झाली मात्र सिंधूने २ गुण मिळवत २१-१९ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच उपांत्यपूर्व फेरीत सियंगने थायलँडच्या पोर्नपावी चोकुवांगला ५५ मिनिटाच्या सामन्यात २५-२३, २१-१७ अशा फरकाने पराभूत केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ind vs NZ 2nd test : मुंबईकर एजाजने आठव्या वर्षीच भारत सोडला होता


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -