घरक्रीडाकॅप्टन कूल धोनीही रागावतो!

कॅप्टन कूल धोनीही रागावतो!

Subscribe

गौतम गंभीरचे उद्गार

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ वर्षांहूनही अधिक काळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने बरीच वर्षे भारताचे नेतृत्व केले. या काळात मैदानावरील शांत आणि संयमी वावरामुळे त्याला कॅप्टन कूल या नावाने संबोधले जाते. परंतु, धोनी हा माणूस असून तोसुद्धा बर्‍याचदा रागावतो असे भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांनी स्पष्ट केले आहे.

लोक म्हणतात की, आम्ही धोनीला कधीही रागावताना पाहिलेले नाही. परंतु, मी त्याला दोन-तीनदा राग आलेला पाहिलेले आहे. २००७ विश्वचषक असो किंवा आणखी एखादा विश्वचषक, आमची कामगिरी चांगली होत नसेल तर धोनी रागवायचा. तोसुद्धा माणूस आहे आणि तो कायम शांत राहू शकत नाही. त्यालाही कधीतरी राग येणारच. चेन्नई सुपर किंग्स संघातही एखाद्या खेळाडूने झेल सोडल्यास तो रागावतो. मात्र, इतर कर्णधारांच्या तुलनेत तो नक्कीच शांत आणि संयमी आहे. माझ्यापेक्षा तरी तो नक्कीच कमी रागावतो, असे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

तसेच इरफान पठाणनेही धोनीला रागावताना पाहिले आहे. २००६-०७ मोसमात सराव करताना उजव्या हाताचे फलंदाज डाव्या हाताने फलंदाजी करायचे आणि डावखुरे फलंदाज उजव्या हाताने खेळायचे. त्यानंतर दोन संघांमध्ये सराव सामना व्हायचा. एका सामन्यात धोनीला बाद ठरवण्यात आले होते, पण त्याच्या मते पंचांचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे त्याने बॅट हवेत फेकली आणि ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्यामुळे धोनी रागावत नाही हे चुकीचे आहे. तोसुद्धा माणूसच आहे, असे पठाणने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -