घरक्रीडापुजाराचे शतक भारत ५ बाद २९७

पुजाराचे शतक भारत ५ बाद २९७

Subscribe

कसोटी संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्याची दमदार सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली उजव्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहे. तो या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष होते. त्याला अवघी १ धाव करता आली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अगरवाल (१२), लोकेश राहुल (३६) आणि रहाणे (१) पहिल्या १५ षटकांतच माघारी परतल्यामुळे भारताची ३ बाद ५३ अशी अवस्था झाली. पुढे पुजारा आणि रोहित यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. रोहितने मिळालेल्या संधीचे सोने करत ११५ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६८ धावा केल्या. त्याला ऑफस्पिनर अकिम फ्रेझरने बाद केले. पुजाराने मात्र एक बाजू लावून धरत शतकी खेळी केली.

- Advertisement -

त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शतक पूर्ण झाल्यावर इतरांना संधी मिळण्यासाठी तो पॅव्हेलियनमध्ये परतला. रिषभ पंत (३३) आणि हनुमा विहारी (नाबाद ३७) यांनी उत्तम फलंदाजी केल्याने पहिल्या दिवसअखेर भारताची ५ बाद २९७ अशी धावसंख्या होती. याच धावसंख्येवर भारताने दुसर्‍या दिवशी आपला डाव घोषित केला.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

भारत : पहिला डाव – ५ बाद २९७ डाव घोषित (पुजारा १००, रोहित ६८, विहारी नाबाद ३७; जॉनाथन कार्टर ३/३९) वि. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड इलेव्हन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -