घरक्रीडाया कामात ख्रिस गेलने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

या कामात ख्रिस गेलने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

Subscribe

विडिंजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात अधिक षटकार मारण्यामध्ये आफ्रिदी टॉपवर होता. मात्र विडिंजच्या ख्रिस गेलने हा विक्रम तोडत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लड अशी एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झालेली आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ख्रिस गेलने हा विक्रम मोडीत काढला.

काल वेस्ट इंडिज वि इग्लंड असा सामना होत असताना गेलने १५ व्या ओव्हरमध्ये मोईन अलीच्या बॉलवर षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८८ षटकाराचा आकडा पार केला. यावेळी आफ्रिदीच्या ४८७ या आकड्याला गेलने पार केले. या विक्रमानंतर गेलने म्हणाला की, “मी चांगल्या स्थितीत आहे. माझे शरीर मला चांगली साथ देतंय. मी माझे वजन देखील कमी केलंय, आता मला ते वाढवायचे नाही. तरिही मी माझ्या सीक्स पॅक अॅब्सवर काम करतोय. मला देखील तरुणांप्रमाणे तंदरुस्त राहायचे असून मांजर जशी चेंडूच्या मागे धावतो त्याप्रमाणे क्रिकेटचा आनंद लुटायचा आहे.”

हे वाचा – युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलची वर्ल्ड कपनंतर वन-डेतून निवृत्ती

- Advertisement -

सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या या यादीत न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रेंडन मॅक्युलमचे नाव आहे. त्याने ३९८ षटकार मारले आहेत. तर ३५२ षटकार मारलेला श्रीलंकेचा सनथ जयसुर्या चौथ्या क्रमाकांवर आहे. तर भारतीय फलंदाजापैकी रोहित शर्मा पाचव्या तर एमस धोनी सहाव्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत ३४९ तर धोनीने ३४८ षटकार मारले आहेत.

काही दिवसांपूर्वी आफ्रिदीला ट्विटरवर याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आफ्रिदीने मजेशीर उत्तर दिले होते. ख्रिसे गेल माझा विक्रम मोडीत काढणार असेल तर मला आनंदच होईल. “एकेदिवशी गेलसोबत सिंगल विकेट मॅच खेळण्याची इच्छा आहे, मग बघू कोण जास्त षटकार मारतो ते”, अशी इच्छा त्याने ट्विटमध्ये व्यक्त केली होती.

- Advertisement -

याच सामन्यात गेलने स्वतःचे २४ वे आंतरराष्ट्रीय शतकही ठोकले आहे. गेलने १२९ बॉलमध्ये १३५ धावा केल्या. या खेळीमध्ये ३ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात ५० ओव्हरमध्ये ३६० धावांचे तगडे आव्हान विडिंजच्या फलंदाजानी दिले होते. मात्र इंग्लडच्या जेसन रॉय आणि जो रुटच्या शतकी खेळीमुळे हे आव्हान ४८.४ मध्येच पुर्ण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -