घरक्रीडाभारत-पाक द्विपक्षीय मालिकेसाठी विनवणी करणार नाही!

भारत-पाक द्विपक्षीय मालिकेसाठी विनवणी करणार नाही!

Subscribe

एहसान मणी यांचे उद्गार

भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात रविवारी सामना होणार आहे. हे दोन देश आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध सामने खेळत असले तरी, त्यांच्यात २०१३ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. मात्र, असे असतानाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हावी यासाठी आम्ही भारतीय नियामक मंडळाला (बीसीसीआय) विनवणी करणार नाही, असे उद्गार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी काढले.

आम्ही भारताच काय, तर कोणत्याही देशाची पाकिस्तानशी सामने खेळण्यासाठी विनवणी करणार नाही. आम्हाला भारताशी द्विपक्षीय मालिका खेळायला नक्कीच आवडेल, पण त्यासाठी आम्ही त्यांना विनवणी अजिबातच करणार नाही. आम्हाला या मालिका सन्मानाने सुरू झालेल्या आवडतील, असे मणी म्हणाले. २००९ पासून पाकिस्तानमध्ये सातत्याने आंतरराष्ट्रीय सामने झालेले नाहीत. पाकिस्तान आपले सामने युएईमध्ये खेळत होते. मात्र, आता लवकरच पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होईल, अशी मणी यांना आशा आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये श्रीलंकेचा संघ २ कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्यानंतर ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामनेही होणार आहेत. याबाबत मणी यांनी सांगितले, श्रीलंकेचा संघ सप्टेंबरमध्ये आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या २ सामन्यांसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० सामनेही होतील. हे सामने यशस्वीरित्या पार पडतील आणि त्यामुळे इतर देशांना सकारात्मक संदेश जाईल, याची मला खात्री आहे.

- Advertisement -

पाक महिला संघ भारतात सामने खेळणार
यावर्षी फेब्रुवारीमध्ये काश्मीरमधील पुलवामामध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळू नयेत अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या दोन देशांमधील विश्वचषक आणि आयसीसी वूमन्स चॅम्पियनशिपच्या सामन्यांचे काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, विश्वचषकासोबतच वूमन्स चॅम्पियनशिपचेही सामने होणार, असे मणी यांनी स्पष्ट केले आहे. आयसीसी वूमन्स चॅम्पियनशिपचे सामने खेळण्यासाठी पाकिस्तान महिला क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे, असे मणी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -