घरक्रीडाकॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला 'हे' स्टार भारतीय खेळाडू मुकणार

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला ‘हे’ स्टार भारतीय खेळाडू मुकणार

Subscribe

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला गुरूवार २८ जुलैपासून सुरवात होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे ही स्पर्ध खेळवली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच बर्मिंगहॅमला पोहोचला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेला गुरूवार २८ जुलैपासून सुरवात होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे ही स्पर्ध खेळवली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच बर्मिंगहॅमला पोहोचला आहे. परंतु, यंदा अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. (cwg 2022 top Indian athletes who will miss Birmingham commonwealth games)

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा, विश्वविजेती मेरी कोम आणि सायना नेहवाल यांच्यासह अनेक स्टार खेळाडू यावेळी राष्ट्रकुलमध्ये आपली चमकदार कामिगीरी दाखवताना दिसणार नाहीत. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे बाहेर पडले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ३२२ सदस्य भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संघात २१५ खेळाडूंचा समावेश केला आहे, तर १०७ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी असणार आहेत.

नीरज चोप्रा : कंबरेला दुखापत झाल्याने नीरज चोप्रा यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

- Advertisement -

मेरी कोम : मेरी कोम सध्या गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. मेरी कोम मागील कॉमनवेल्थमध्ये चॅम्पियन होती. यावेळी ट्रायलदरम्यान ती जखमी झाली होती.

सायना नेहवाल : बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही २०१०, २०१८ सालची राष्ट्रकुल चॅम्पियन आहे. यंदा वादांमुळे ती बाहेर पडली आहे. वास्तविक, दुखापती आणि थकव्यामुळे सायना ट्रायल्सला उपस्थित राहिली नाही. तरीही तिला राष्ट्रकुलसाठी संधी हवी होती, मात्र नियमांमुळे तिला संधी मिळाली नाही.

हॉकीपटू राणी रामपाल : भारतीय महिला हॉकी संघाला स्टार स्ट्रायकर राणी रामपालशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी राणी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती.

शॉट पुट तेजिंदरपाल सिंग तूर : शॉट पुट तेजिंदरपाल सिंग पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली नाही.

एचएस प्रणॉय : थॉमस चषकात ऐतिहासिक विजय मिळवणारा बॅडमिंटन स्टार एचएस प्रणॉय राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. १० सदस्यीय बॅडमिंटन संघात त्याची निवड झाली नव्हती. या टीममध्ये किंदाबी श्रीकांत, पीव्ही सिंधू लक्ष्य सेन, आकर्षी कश्यप यांची एकेरीसाठी निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा – ठरलं! महिला विश्वचषक भारतात होणार; आयसीसीची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -