घरक्रीडाDevdutt Padikkal Fifty: याला म्हणतात तुफान फलंदाजी! देवदत्त पडिक्कलने SIX ठोकत पूर्ण...

Devdutt Padikkal Fifty: याला म्हणतात तुफान फलंदाजी! देवदत्त पडिक्कलने SIX ठोकत पूर्ण केले पहिले अर्धशतक

Subscribe

धरमशाला: 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवले आहे. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल अर्धशतक झळकावून बाद झाला आणि त्यानंतर आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतके झळकावली. यानंतर मैदानात आलेल्या सरफराज खाननेही अर्धशतक झळकावले, तर नवोदित देवदत्त पडिक्कलने 83 चेंडूत अर्धशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. पहिला सामना खेळणाऱ्या पडिक्कलने सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केले तेव्हा सर्वांनी उभं राहून अभिमानाने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. (Devdutt Padikkal Fifty It s called a batting storm Devdutt Padikkal completed his maiden half century with a SIX)

षटकार ठोकत अर्धशतक केलं पूर्ण

पडिक्कलने शोएब बशीरच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑनला सिक्स ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच मालिकेतून पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारच्या जागी पडिक्कलला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली होती. पडिक्कल एकेकाळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता आणि नंतर राजस्थान रॉयल्स मार्गे लखनऊ सुपरजायंट्समध्ये पोहोचला.

- Advertisement -

या सामन्यात पडिक्कलने शोएब बशीरच्या गोलंदाजीवर 10 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने 103 चेंडूंचा सामना केला. बशीरची ही तिसरी विकेट होती. तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना टीम इंडियाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. पडिक्कलने गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली. तो शतकाच्या वाटेवर असताना शोएब बशीरचा एक चेंडू चुकला आणि पुढे जे घडले ते भारतासाठी चांगले नव्हते. चेंडू स्टंपवरून उडून गेला आणि देवदत्त पडिक्कलला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याने 65 धावांची खेळी खेळली.

(हेही वाचा: Parivarvaad : आम्हीच मोदींना गोल करण्याची संधी दिली, ओमर अब्दुल्लांचा लालूंवर निशाणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -