घरक्रीडाधोनीने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करावी

धोनीने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करावी

Subscribe

भारताचा अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी अजूनही मोठमोठे षटकार मारू शकतो आणि त्यामुळे त्याने आपल्या डावाच्या सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला हवी, असे मत त्याचा चेन्नई सुपर किंग्समधील सहकारी आणि भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले आहे. धोनी मागील बर्‍याच वर्षांपासून आव्हानाचा पाठलाग करताना खेळ अखेरच्या काही षटकांपर्यंत नेत मग फटकेबाजी करताना दिसतो. त्याने अशाच प्रकारे भारताला बरेच सामने जिंकवून दिली आहेत. मात्र, आता त्याला संघ व्यस्थापनाने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्याची परवानगी दिली पाहिजे असे हरभजनला वाटते.

माझ्या मते धोनी जेव्हा सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात करतो, तेव्हा तो सर्वात चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे मला असे वाटते की संघ व्यवस्थापनाने त्याला आणि हार्दिक पांड्याला आपला नैसर्गिक खेळ करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांच्यावर कोणत्याही मर्यादा लादता कामा नयेत. पाचव्या क्रमांकावर येणार्‍या फलंदाजाने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करावी, असे हरभजनने सांगितले.

- Advertisement -

मागील काही काळात धोनी मधल्या षटकांत फिरकीपटूंविरुद्ध अडचणीत सापडताना दिसत आहे. मात्र, त्याला मोकळीक दिल्यास तो फिरकीपटूंविरुद्धही फटकेबाजी करू शकतो, असे हरभजनचे मत आहे. तो म्हणाला, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला धोनी फिरकीपटूंविरुद्ध सुरुवातींपासून मोठे षटकार मारण्यास सुरुवात करायचा. तो अजूनही मोठे फटके मारू शकतो हे मी चेन्नईसाठी खेळताना नेट्समध्ये पाहिले आहे. त्याच्या षटकारांमध्ये अजूनही खूप ताकद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -