घरक्रीडाध्रुव मोहितेला ‘अमिओ अप २०१८’ चे विजेतेपद

ध्रुव मोहितेला ‘अमिओ अप २०१८’ चे विजेतेपद

Subscribe

कोल्हापूरच्या ध्रुव मोहिते याने अमिओ कप २०१८ च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

ग्रेटर नॉएडामधील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे पार पडलेल्या ‘एमएमएससी एमआरएफ फोक्सवॅगन अमिओ कप २०१८’ च्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या ध्रुव मोहिते याने जेतेपद पटकावले.

ही शर्यत सुरू झाली तेव्हा ध्रुव मोहिते पहिल्या वळणावर जोरदार मुसंडी मारत सर्वांच्या पुढे निघून गेला. पहिल्या लॅपमध्येच त्याची प्रतिक सोनावणेसोबत झटापट झाली आणि त्याने ध्रुवला पिछाडीस टाकले. यामुळे ध्रुव बहल याला आघाडी घेण्याची संधी मिळाली त्या पाठोपाठ प्रतिक सोनावणे आणि सौरव बंडोपाध्याय यांनी वर्णी लावली. पहिल्या लॅपच्या शेवटच्या कॉर्नरवर अरीफिन रफी अहमद याच्याबाबतीत गडबड झाल्यामुळे सेफ्टीकारला बाहेर येणे भाग पडले. आरीफीनची गाडी शेवटच्या कोपऱ्यात उभी राहिल्यामुळे शर्यतीला लाल झेंडा दाखवला गेला आणि ती पुन्हा सुरू करावी लागली. शर्यतीला पुन्हा आरंभ झाल्यानंतर काहीच वेळात शुभोमय बाल तिसऱ्या कोपऱ्यात गेला ज्यामुळे सेफ्टी कारला पुन्हा एकदा परत येणे भाग पडले आणि उर्वरित शर्यत सेफ्टी कारच्या देखरेखीतच पार पडली. चौकटीचा झेंडा घेऊन सेफ्टी कार शेवटच्या लॅपला पिटमध्ये पुन्हा जाईपर्यंत आघाडीच्या तीन चालकांनी एकाच रांगेमधून प्रवास सुरू ठेवला.

- Advertisement -

दुसरी शर्यत सुरू झाली तेव्हा जीत पोल पोझिशनवर होता. ध्रुव मोहिते दुसऱ्या तर अनमोल सिंग तिसऱ्या स्थानावर होते. शर्यतीच्या दुसऱ्या लॅपवर अक्षय भिवशेट आणि तौहीद अन्वर पहिल्या कोपऱ्यावर धडकले ज्यामुळे सेफ्टी कार बाहेर आली. केवळ दोनच लॅपनंतर सेफ्टी कार परत गेली आणि चालकांना पुन्हा एकदा शर्यतीत वेग घेता आला. पाचव्या लॅपच्या वेळी अफान याने अनमोलला तिसऱ्या स्थानासाठी अटीतटीची टक्कर दिली त्याला मागे टाकून शेवटच्या लॅपपर्यंत तो तिसऱ्या स्थानावर राहिला. अनमोलने देखील अखेरपर्यंत जिद्द सोडली नाही आणि शेवटच्या लॅपचे वेळी अफानला पुन्हा पिछाडी दाखवत पोडीयमवरील अंतिम बिंदू साध्य केला.

ध्रुव शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आल्याने त्याला सौरव बंडोपाध्याय याच्यावर गुणांची जोरदार आघाडी घेता आली. त्यामुळे त्याच्याकडे अमिओ कप २०१८ वर आपले नाव कोरण्याइतके गुण जमा झाले. अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकाविण्यासाठी सौरव आणि जीत यांच्यात झालेली तुंबळ झटापट अतिशय उत्कंठावर्धक ठरली. ज्यामध्ये जीतला एकंदर तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमिओ कप २०१८ चा ज्युनिअर सितारा शुभोमय बाल याने संपूर्ण मोसमात जबरदस्त समर्पण दाखवले. ज्युनिअर श्रेणीत अंतिम टप्प्यात त्याने तब्बल ९२ गुणांच्या फरकाने आघाडी घेतली तेव्हाच शुभोमयसाठी ते विजेतेपद सुनिश्चित झालेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -