घरक्रीडादीपा कर्माकरची सुवर्णमय कामगिरी

दीपा कर्माकरची सुवर्णमय कामगिरी

Subscribe

जिमनॅस्टीकपटू दीपा कर्माकर हिने वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून पुन्हा एकदा नाव उंचावले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार पुनरागम करत तिने सुवर्ण कामगिरी केली आहे.

भारतीय जिमनॅस्टीकपटू दीपा कर्माकर हिने वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. दुखापतग्रस्त झाल्याच्या दोन वर्षांनंतर दीपाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली आहे. तुर्कीच्या मर्सिन शहरात एफआयजी आर्टिस्टिक जिमनॅस्टीक वर्ल्ड चॅलेंज कपचे आयोजन करण्यात आले होते. दीपा हिने स्पर्धेच्या पात्रता फेरीत १३.४ गुण मिळवले होते. त्यानंतर वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम फेरीत १४.१५ गुण मिळवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. वर्ल्ड चॅलेंज कपमधील दीपाचे हे पहिले पदक आहे.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक

पंतप्रधान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “दीपा कर्माकर भारताला तुझ्यावर गर्व आहे. तुर्कीच्या जिमनॅस्टीक विश्वचषकाच्या व्हॉल्ट इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन! हा विजय दीपाचा दृढनिश्चय आणि पराभवला न घाबरणाऱ्या वृत्तीमुळे झालेला आहे.”

- Advertisement -

अमिताभकडून कौतुक

वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत दीपाने सुवर्णपदक पटकावल्याचा मला अभिमान आहे. अमिताभ यांनी ट्विट करुन तिचे कौतुक केले असून दीपा हिने त्यांच्या ट्विटला रिप्लाय देऊन आभार मानले आहेत.

- Advertisement -

दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन

रिओ ऑलिम्पिकमध्ये थोड्याशा फरकाने दीपाचे सुवर्णपदक हुकले होते. त्यानंतर दीपाला दुखापतीने ग्रासले होते. या दरम्यान तिच्यावर एक सर्जरीसुध्दा करण्यात आली होती. कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत ती फिट होऊन पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु तिला बरे होण्यासाठी खुप अवधी लागला. दुखापतीनंतर तुर्कीत पहिल्यांदाच दीपा खेळण्यासाठी उतरली होती. यावेळी तिने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ खेळला आणि वर्ल्ड चॅलेंजकपमध्ये व्हॉल्ट प्रकारात अव्वल कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -