घरक्रीडाजोकोविचची अंतिम फेरीत धडक

जोकोविचची अंतिम फेरीत धडक

Subscribe

ऑस्ट्रेलियन ओपन

सर्बियाचा स्टार खेळाडू आणि पहिल्या सीडेड नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जोकोविचने फ्रान्सच्या लुकास पॉइलेला ६-०, ६-२, ६-२ असे सहज पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत एकही सामना न गमावण्याचा आपला विक्रम अबाधित ठेवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत.

लुकास पॉइलेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्याच्या सुरुवातीपासूच जोकोविचने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे पॉइलेला तीन सेटमध्ये मिळून अवघे ४ गेम जिंकता आले. या सामन्यात जोकोविचने पॉइलेची सर्व्हिस ७ वेळा मोडली तर २४ वर्षीय पॉइलेला मात्र जोकोविचची एकही सर्व्हिस मोडता आली नाही. त्यामुळे जोकोविचने हा सामना सहजपणे जिंकला. आता रविवारी होणार्‍या अंतिम फेरीत जोकोविचचा दुसर्‍या सीडेड राफेल नदालशी सामना होईल.

- Advertisement -

या अंतिम सामन्याविषयी जोकोविच म्हणाला, मी या सामन्याचे तिकीट लगेच विकत घेतले असते. २०१२ मध्येही आम्ही अंतिम सामन्यात खेळलो होतो. त्यावेळी खूपच अप्रतिम सामना झाला होता. मला आशा आहे की यंदाचा अंतिम सामनाही रंगतदार होईल आणि २०१२ प्रमाणेच मी हा सामना जिंकीन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -