घरक्रीडाजोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

Subscribe

पुरूष दुहेरीत बोपन्नाची आगेकूच,पेस स्पर्धेबाहेर

येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत गतविजेत्या आणि अव्वल सिडेड नोव्हाक जोकोविचने अमेरिकेच्या बिन सिडेड डेनिस कुडला याला 6-3,6-4,6-2 असे सरळसेटमध्ये पराभत केले.या विजयानंतर जोकोविचने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत त्याचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वॉवरिंकाशी होणार आहे.

तर पुरूष दुहेरीत रोहन बोपण्णाने डेनिस शापोवालोवच्या साथीने दुसरी फेरी गाठली.मात्र, लिएंडर पेस आणि गुलीरेमो दुरान या जोडीला पहिल्या फेरीतच गारद व्हावे लागले.कॅनडाचा डेनिस शापोवालोव आणि रोहन बोपण्णा विरूद्ध फ्रान्सच्या माहूत आणि पियरे ह्यूजेस हर्बर्ट हा सामना ५५ मिनिटांपर्यंत रंगला होता. परंतु,बोपन्ना आणि शापोवालोव या जोडीने माहूत आणि पियरे ह्यूजेस हर्बर्ट यांना ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले.

- Advertisement -

शापोवालोव आणि बोपण्णाने दोन वेळा सर्व्हिस गमावली. मात्र, त्यांनी सातपैकी सहा वेळा प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस ब्रेक केली. दुसरीकडे, लिएंडर पेस आणि अर्जेंटिनाच्या गुलीरेमो दुरान यांना सर्बियाच्या मिमोमीर आणि नॉर्वेच्या कॅस्पर रुडकडून ५-७, २-६ असा पराभव स्वीकाराला लागला. दिविज शरण आणि हुगो नीस यांना आधीच स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -