घरक्रीडाजेम्स अँडरसनच्या नावावर नवा विश्वविक्रम; कसोटीत ६०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

जेम्स अँडरसनच्या नावावर नवा विश्वविक्रम; कसोटीत ६०० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

Subscribe

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना साऊथहॅम्प्टनच्या एजस् बाऊल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. अँडरसनने मंगळवारी पाकिस्तान विरुद्धच्या (England vs Pakistan 3rd Test) तिसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या ५ व्या दिवशी ही कामगिरी केली. अँडरसनच्या आधी ही कामगिरी करणारे गोलंदाज हे सर्व फिरकी गोलंदाज आहेत. अँडरसनने कारकिर्दीतील १५६ व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान तिसर्‍या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला. पाचव्या दिवसाच्या तिसर्‍या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळी पूर्ण झाले. याआधी श्रीलंकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) सर्वाधिक ८०० बळी घेतले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) ७०८ बळी घेतले आहेत. भारताचा माजी कसोटी कर्णधार आणि लेगस्पिनर अनिल कुंबळे यांच्या नावावर ६१९ कसोटी विकेट आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानचा कर्णधार अझर अली ठरला ६०० वा बळी

जेम्स अँडरसनचा ६०० वा बळी हा पाकिस्तानचा कर्णधार अझर अली ठरला आहे. पाचव्या दिवशी दोन सत्रांचा डाव पावसामुळे खेळवला गेला नाही. अँडरसनने अझर अलीला पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या जो रूटकरवी झेलबाद करत ६०० वा बळी घेतला. अझर अली ३१ धावांवर बाद झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -