घरक्रीडामँचेस्टर युनायटेड-शेफील्ड सामन्यात बरोबरी

मँचेस्टर युनायटेड-शेफील्ड सामन्यात बरोबरी

Subscribe

मँचेस्टर युनायटेड आणि शेफील्ड युनायटेड यांच्यातील इंग्लिश प्रीमियर लीगचा रंगतदार सामना ३-३ असा बरोबरीत संपला. या सामन्यात शेफील्डने २-० अशी आघाडी घेतली होती, पण मँचेस्टरने ७ मिनिटांतच तीन गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवली. ते हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच ९० व्या मिनिटाला ऑली मॅकबर्नीने गोल करत शेफील्डला ३-३ अशी बरोबरी करून दिली. हा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना १-१ गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे १३ सामन्यांनंतर प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात शेफील्डचा संघ १८ गुणांसह सहाव्या, तर मँचेस्टर युनायटेडचा संघ १७ गुणांसह नवव्या स्थानी आहे.

या सामन्याच्या सुरुवातीला शेफील्डने आक्रमक खेळ केल्याने त्यांना गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या. मात्र, मँचेस्टरचा गोलरक्षक डेविड ड गेयाच्या अप्रतिम खेळामुळे त्यांना गोल करता आला नाही. त्यांना आपल्या पहिल्या गोलसाठी फारकाळ वाट पाहावी लागली नाही. १९ व्या मिनिटाला जॉन फ्लेकने केलेल्या गोलमुळे शेफील्डला १-० अशी आघाडी मिळाली. त्यांनी ही आघाडी मध्यंतरापर्यंत राखली. त्यानंतरही शेफील्डने चांगला खेळ सुरू ठेवत ५२ व्या मिनिटाला आपली आघाडी दुप्पट केली. त्यांचा हा गोल लेस मुसेटने केला.

- Advertisement -

पुढे मँचेस्टर युनायटेडने आपल्या खेळात सुधारणा केली. ७२ व्या मिनिटाला ब्रँडन विल्यम्स, ७७ व्या मिनिटाला मेसन ग्रीनवूड आणि ७९ व्हा मिनिटाला मार्कस रॅशफोर्डने गोल करत मँचेस्टर युनायटेडला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना शेफील्डच्या मॅकबर्नीने गोल केल्याने सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -