घरक्रीडाडू प्लेसी, मिलरच्या शतकांमुळे द. आफ्रिकेने जिंकली मालिका

डू प्लेसी, मिलरच्या शतकांमुळे द. आफ्रिकेने जिंकली मालिका

Subscribe

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना जिंकत द.आफ्रिकेने वनडे मालिका २-१ अशी जिंकली.

कर्णधार फाफ डू प्लेसी आणि डेव्हिड मिलर यांनी केलेल्या शतकांमुळे द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या वनडे सामन्यात ४० धावांनी पराभव केला. त्यामुळे द.आफ्रिकेने ३ सामन्यांची ही वनडे मालिका २-१ अशी जिंकली. या सामन्यात १३९ तर मालिकेत सर्वाधिक १९२ धावा करणाऱ्या डेविड मिलरला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

डू प्लेसी-मिलरची २५२ धावांची भागीदारी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. द.आफ्रिकेच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे सलामीवीर क्विंटन डी कॉक (४) आणि रेझा हेन्ड्रिक्स (८) लवकर बाद झाले. तर मार्कर्मही ३२ धावा करून बाद झाला. त्यामुळे १५ षटकांनंतर द.आफ्रिकेची अवस्था ३ बाद ५५ अशी होती. यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसी आणि डेव्हिड मिलर यांनी मिळून द.आफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनी अप्रतिम फलंदाजी केली. दोघांनी चौथ्या विकेसाठी २३ षटकांत २५२ धावांची भागीदारी केली. डू प्लेसीने १२५ तर मिलरने १३९ धावा केल्या. त्यामुळे द.आफ्रिकेने आपल्या ५० षटकांत ३२० धावा केल्या.

शॉन मार्शचे शतक 

३२१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. क्रिस लिन, अॅरोन फिंच आणि त्रावीस हेड हे झटपट माघारी परतले. यानंतर शॉन मार्श आणि मार्कस स्टोइनीस यांनी चांगली फलंदाजी केली. दोघांनी चौथ्या विकेसाठी १०७ धावांची भागीदारी केली. स्टोइनीस ६३ धावा करून बाद झाला. तर काही काळाने मार्श १०६ धावा करून बाद झाला. यानंतर अॅलेक्स कॅरी (४२) आणि ग्लेन मॅक्सवेल (३५) ने लढा देण्याचा प्रयत्न केला. पण ते ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. द.आफ्रिकेने हा सामना ४० धावांनी जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -