घरक्रीडाहॅटट्रिकमागे चार-पाच महिन्यांची मेहनत!

हॅटट्रिकमागे चार-पाच महिन्यांची मेहनत!

Subscribe

भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. या सामन्याच्या ३३ व्या षटकात त्याने शाई होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. ही त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी हॅटट्रिक ठरली. ही माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती, असे सामन्यानंतर कुलदीप म्हणाला.

तसेच या कामगिरीमागे चार-पाच महिन्यांची मेहनत होती, असेही त्याने सांगितले. कुलदीपने २०१७ ते २०१९ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांपर्यंत भारताकडून अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र, आयपीएल स्पर्धा आणि त्यानंतर विश्वचषकात त्याने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याला जवळपास चार महिने भारतीय संघाबाहेर रहावे लागले होते.

- Advertisement -

मागील १० महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. मी आधी खूप सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर अशी वेळ आली की, मला विकेट्स मिळत नव्हत्या. त्यामुळे मी गोलंदाजीचा खूप विचार करु लागलो. विश्वचषकानंतर मला भारतीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतरच्या मी चार महिन्यांत खूप मेहनत घेतली.

मुंबईमध्ये झालेला टी-२० सामना हा चार महिन्यांत माझा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे माझ्यावर खूप दबाव होता. आता या एकदिवसीय सामन्यातही माझ्यावर थोडे दडपण होते. मात्र, मी हॅटट्रिक घेतल्याचा आनंद आहे. ही माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती. या कामगिरीमागे चार-पाच महिन्यांची मेहनत होती, असे कुलदीपने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -