घरक्रीडाशेवटच्या षटकापर्यंत सामना गेल्याने हार्दिक पंड्या नाराज; म्हणाला...

शेवटच्या षटकापर्यंत सामना गेल्याने हार्दिक पंड्या नाराज; म्हणाला…

Subscribe

नवी दिल्ली : मोहाली काल पार पडलेल्या आयपीएलच्या 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) 6 विकेट आणि 1 चेंडू राखून विजय मिळवला. सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, मधल्या षटकामध्ये आम्ही जास्त जोखीम पत्करू शकलो असतो, सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाण्याचा मी चाहता नाही.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून पंजाब संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आणि पंजाबने निर्धारीत 20 षटकात 8 विकेट गमावत 153 धावांपर्यंत मजल मराली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने चांगली सुरूवात केली. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने 49 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 67 धावांची शानदार खेळी केली. पण पंजाबच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये उत्तम गोलंदाजी केल्यामुळे गुजरातचा रनरेट मंदावला. त्यामुळे कमी धावसंख्येचा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला.

- Advertisement -

गुजरातला शेवटच्या दोन षटकांत १३ धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने 19व्या षटकात चांगली गोलंदाजी करत केवळ 6 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना सॅम करनने पहिल्या 4 चेंडूत 2 धावा देत शुभमन गिलला बाद केले. त्यामुळे 2 चेंडूत 4 धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर तेवतियाने चौकार मारत एक चेंडू शिल्लक राखून गुजरातला विजय मिळवून दिला.

सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, “आम्हाला या सामन्यातून खूप काही शिकायचे आहे. हा सामना शेवटच्या शतकापर्यंत जायला नको होता. विकेट चांगली आणि कठीण होती, त्यामुळे आम्ही मधल्या षटकांमध्ये जास्त जोखीम पत्करू शकलो असतो. नवीन चेंडूने फलंदाजी करणे सोपे होते, कारण चेंडू सहज येत होता. त्यामुळे आमचा या सामन्यात पराभव झाला असता तर आमच्यासाठी अवघड गेले असते. यावर आम्ही सामन्यानंतर चर्चा करूच. पण शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन जाण्याचा मी चाहता नाही, असे हार्दिक पांड्या म्हणाला.”

- Advertisement -

रबाडाची 100 वी विकेट
कागिसो रबाडाने वृद्धीमान साहाला बाद करत आयपीएलमधील ही शंभरावी विकेट घेतली. त्याने 64 सामन्यात आपल्या 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यावेळी त्याने 21 धावा देत 4 विकेट घेतल्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -