घरक्रीडाAsian games 2018: हिमा दास आणि मोहम्मद अनास यांना रौप्यपदक

Asian games 2018: हिमा दास आणि मोहम्मद अनास यांना रौप्यपदक

Subscribe

१८ वर्षीय हिमा दास आणि मोहम्मद अनास या दोघांनीही रौप्य पदकांची कमाई केली आहे. तर गोविंदन लक्ष्मणन यानं १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.

एशियन गेम्समध्ये आजचा दिवस खास ठरला आहे कारण तब्बल ३६ वर्षांनी भारताला घोडेस्वारीत पदक मिळाले तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये १८ वर्षीय हिमा दास आणि मोहम्मद अनास या दोघांनीही रौप्य पदकांची कमाई केली आहे. हिमा दासनं ४०० मीटर अंतर ५०.७९ सेकंदामध्ये पार केलं असून मोहम्मद अनासनंही हे अंतर ४५.६९ सेकंदामध्ये पार करत रौप्य पदक आपल्या नावे केलं. तर गोविंदन लक्ष्मणन यानं १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गोविंदननं हे अंतर २९.४४ सेकंदामध्ये पार करण्यात यश मिळवलं आहे.

घोडस्वारीत दोन रौप्य

दरम्यान रविवारीच फाऊदच्या सिंगल जंपिगं सोबतच टीम इव्हेटं स्पर्धेतही रौप्य पदकाची कमाई केली आहे. फाऊदसोबत राकेश कुमार, आशिष मलिक आणि जितेंद्र सिंह यांनी एकत्रित हे यश संपादन केले आहे. टीम इव्हेंटमध्ये जपान (सुवर्ण), भारत (रौप्य) आणि थायलंड (कांस्य) प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

जपानला टाकले मागे

पदकांचा विचार केला तर पदक संख्येत चीन आणि जपान अग्रक्रमावर आहे. घोडेस्वारीत जपानला मागे टाकत भारतीय खेळाडूंनी हे पदक मिळवले आहे. फाऊद ने २६.४० इतका स्कोर मिळवत पदक मिळवले आहे. चीन आणि जपानमध्ये अतितटीचा सामना होता. पण जपानला मागे टाकत फाऊदने यश संपादन केले. या खेळात चीनचा २७.१० स्कोर होता.त्यामुळे चीन, भारत आणि जपान अशी अनुक्रमे पदकं मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -