घरक्रीडा'या' धावपटूने चार दिवसात दोन सुवर्ण पदक पटकावले

‘या’ धावपटूने चार दिवसात दोन सुवर्ण पदक पटकावले

Subscribe

भारतीय धावपटू हिमा दास हिने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने सलग चार दिवसात दोन सुवर्ण पदक पटकावले आहे.

पोलंड येथे सुरु असलेल्या स्पर्धेत हिमा दास हीने सुवर्ण कामगिरी केली आहे. भारतीय वेगवान धावपटू हिमा दासने ऐतिहासिक कामगिरी केली असून सलग चार दिवसात दुसरे सुवर्ण पदक कमावले आहे. हिमा दासने याआधी ५ जुलै रोजी झालेल्या २०० मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात सुवर्ण पदक कमावले आहे.

वर्ल्ड ज्युनिअर चम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड ४०० मीटर स्पर्धेत हिमा दासचे नाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती पाठीदुखीने त्रस्त होती. पण तरीही तिने या स्पर्धेत सहभाग घेतला. २३.७७ सेंकदामध्ये २०० मीटरचे अंतर हिमाने पार केलं. तर वीके विस्मयाने दुसरे स्थान २४.०६ सेकंदात २०० मीटर अंतर पार करत मिळवलं आहे. मोहम्मद अनसनेही पुरुषामध्ये २१ सेकंदामध्ये २०० मीटर अंतर पार करत आपले नाव सुवर्णपदकावर कोरले आहे.

- Advertisement -

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी टि्वटरच्या माध्यमातून हिमा दासचे अभिनंदन केलं आहे. टि्वटमध्ये त्यांनी असं म्हटलं की, ‘आसामच्या या खेळाडूने तिच्या विजयात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. हिमाच्या या कामगिरीने नवीन खेळाडूंना प्रेरणा मिळेल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -