घरक्रीडाटी-२०, वनडेमध्ये मी अजूनही भारताला सामने जिंकवून देऊ शकतो!

टी-२०, वनडेमध्ये मी अजूनही भारताला सामने जिंकवून देऊ शकतो!

Subscribe

चांगल्या कामगिरीचा रविचंद्रन अश्विनला विश्वास आहे.   

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. अश्विनने चार सामन्यांच्या या मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट घेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. या मालिकेदरम्यान त्याने ४०० कसोटी विकेटचा टप्पाही पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असला तरी अश्विनला भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघातून खेळण्याची आता संधी मिळत नाही. त्याने २०१७ नंतर भारताकडून मर्यादित षटकांचा सामना खेळलेला नाही. मात्र, संधी मिळाली तर अजूनही टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला सामने जिंकवून देण्याचा विश्वास अश्विनला आहे.

कामगिरीबाबत समाधानी

‘तुमची स्पर्धा ही इतरांशी नाही, तर स्वतःशीच असते,’ असे म्हटले जाते. मी ही गोष्ट मानतो. मात्र, आता मी आयुष्यात संतुलन कसे साधायचे हे शिकलो आहे. माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात मला यश आले आहे. मात्र, मी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट अजूनही खेळू शकतो का? असा प्रश्न क्रिकेटचे काही जाणकार किंवा चाहते बरेचदा उपस्थित करतात. त्यांच्या या प्रश्नावर मला हसू येते, असे अश्विन म्हणाला.

- Advertisement -

लोकांच्या मताने फरक पडत नाही

मी सध्या ज्याप्रकारे क्रिकेट खेळत आहे आणि आयुष्यात मला जितके यश मिळत आहे, त्याने मी समाधानी आहे. मला टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळाली, तर मी अजूनही भारताला सामने जिंकवून देऊ शकतो, असा मला विश्वास आहे. त्यामुळे लोक माझ्याबाबत काय विचार करतात? ते माझ्याबाबत कोणते प्रश्न उपस्थित करतात? याने मला काहीच फरक पडत नाही, असेही अश्विनने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -