घरक्रीडाICC WTC Point Table : कानपूरमधील ड्रॉ सामन्याचा भारताला झटका; कसोटी चॅम्पियनशिपच्या...

ICC WTC Point Table : कानपूरमधील ड्रॉ सामन्याचा भारताला झटका; कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारताच्या वरचढ पाकिस्तान

Subscribe

भारतासाठी कानपूर कसोटीतील न्यूझीलंडविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्याने भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे

भारतासाठी कानपूर कसोटीतील न्यूझीलंडविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्याने भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ च्या गुणतालिकेत भारतीय संघ पिछाडीवर गेला आहे. कारण कानपूरमधील कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयापासून वंचित रहावे लागले होते. तर दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशला त्यांच्याच धरतीवर जाऊन पराभूत केले आहे. यामुळेच पाकिस्तानने क्रमवारीच जोरदार मुसंडी मारून भारतापेक्षा पुढे जागा मिळवली. आयसीसीने जाहीर केलेल्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ अव्वल तर पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच एक सामना खेळला आणि त्यात विजय मिळवला त्यामुळे त्यांच्या संघाची विजयाची क्षमता देखील शंभर टक्के राहिली आहे.

तर पाकिस्तानचा संघ २४ अंकासह आणि ६६.६६ टक्क्यांच्या विजयाच्या क्षमतेनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाची विजयाची क्षमता ५० टक्के एवढी आहे. बदल्यात भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. जर अंकाच्या बाबतीत पाहिले तर भारतीय संघाचे सर्वाधिक ३० गुण आहेत.

- Advertisement -

भारताने नवीन कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात दोन जिंकले तर एक सामना गमावला आणि दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. नवीन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाची ही दुसरी कसोटी मालिका आहे. तर भारताचे दोन गुण घटले देखील आहेत कारण संघाने पेनाल्टी म्हणजेच दंडात्मक षटके टाकली होती.

- Advertisement -

आयसीसीने सुरू केलेली ही दुसरी कसोटी चॅम्पियनशिप आहे. पहिली चॅम्पियनशिप न्यूझीलंडने जिंकली होती आणि त्याच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला होता. कोणताही संघ एक कसोटी सामना जिंकल्यानंतर त्या संघाला १२ गुण मिळतात. तर सामना अनिर्णित राहिल्यास ४ गुण, सामना बरोबरीचा ठरल्यास ६ गुण दिले जातात.


हे ही वाचा: http://IND vs NZ Test : डाव घोषित करण्यात भारतीय संघाने उशीर केला?; कोच द्रविड यांनी म्हंटले…


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -