घरक्रीडाIND vs AUS third test : पुजाराची संथ खेळी भारताला महागात पडू...

IND vs AUS third test : पुजाराची संथ खेळी भारताला महागात पडू शकेल

Subscribe

पुजारा हा खूप चांगला फलंदाज आहे. पण तो जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा भारताला रन रेट वाढवता येत नाही.

चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला. पुजाराचे हे या मालिकेतील दुसरे शतक होते. त्याने ३१९ चेंडूंत १०६ धावा केल्या. मात्र, पुजाराची ही संथ खेळी भारताला महागात पडू शकेल असे मत भारताचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले आहे.

पुजाराला धावांच्या वेगाची चिंता नाही  

पॉन्टिंग म्हणाला, भारत हा सामना जिंकला तर पुजाराच्या खेळीचे कौतुक होईल. पण जर भारताला दुसऱ्यांदा गोलंदाजीसाठी वेळ उरला नाही आणि हा सामना अनिर्णित राहिला तर त्यासाठी पुजाराची संथ खेळी जबाबदार असेल. पुजारा हा खूप चांगला फलंदाज आहे. पण तो जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा भारताला रन रेट वाढवता येत नाही. त्याचे हे या मालिकेतील दुसरे शतक होते. त्याला बाद करणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अवघड जात आहे. पण पुजारा जेव्हा खेळत असतो तेव्हा असे वाटते की त्याला धावांच्या वेगाची फार चिंता नाही. त्याला फक्त खेळपट्टीवर टिकायचे असते. भारताकडे इतर फलंदाज आहेत, जे आक्रमक फलंदाजी करू शकतात. पण ते लवकर बाद झाले तर भारताची धावसंख्या वेगाने वाढत नाही. याचा भारताच्या जिंकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -