घरमुंबईटिळकनगर स्टेशनजवळील आग आटोक्यात, ३ जणांचा मृत्यू

टिळकनगर स्टेशनजवळील आग आटोक्यात, ३ जणांचा मृत्यू

Subscribe

सदर आग ही सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तर या आगीतील २ जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मुंबईत डिसेंबर महिन्यात आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. ही घटना ताजी असतानाच कांदिवली परिसरात आग लागली आणि आज टिळकनगर येथे आगीची घटना घडली आहे. टिळकनगरच्या सरगम सोसायटीतील इमारत क्रमांक ३५ च्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली. संंध्याकाळी ७.५१ च्या सुमारास ही आग लागल्याचे कळत असून आगीत काही नागरीक अडकल्याचे देखील समजत आहे. सध्या या ठिकाणी १५ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या असून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पण आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीत ५ ते ६ घरे जळून खाक झाली आहेत.

- Advertisement -
कांदिवली आग दुर्घटना : ४ मृतदेह ताब्यात, शोधकार्य सुरू

सिलेंडरच्या स्फोटामुळे आग 

सदर आग ही सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तर या आगीतील २ जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. टिळकनगर येथील गणेश गार्डनजवळ ही सरगम सोसायटी आहे. या इमारती १५ मजली असून इमारत क्रमांक ३५ च्या बी विंगच्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली . या आगीत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही मृत ज्येष्ठ नागरीक असून सुनिता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२) सुमन श्रीनिवास जोशी (८३)  यांचा समावेश आहे. तर श्रीनिवास जोशी हे गंभीर असून आगीच्या धुरामुळे त्यांना श्वसनास त्रास होत आहे.

कांदिवलीच्या दामू नगर येथे कपड्याच्या कारखान्याला आग

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -