घरताज्या घडामोडीकाँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर समाजकंटकांचा हल्ला

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर समाजकंटकांचा हल्ला

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर समाजकंटकांनी हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी खुर्शीद यांच्या घरातील सामानाची तोडफोड करत जाळपोळही केली. दरम्यान, याप्रकरणी राकेश कपिल यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


खुर्शीद यांनी फेसबुकवर त्यांच्या नैनिताल येथील घराला आग लागल्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच घरात तोडफोड झाल्याचेही यात दिसत आहे.

- Advertisement -

I hoped to open these doors to my friends who have left this calling card. Am I still wrong to say this cannot be Hinduism?

Posted by Salman Khurshid on Monday, November 15, 2021

 

- Advertisement -

खुर्शीद यांच्या सनराईज ओव्हर अयोध्या या पुसत्कारवरून सध्या वाद सुरू आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि आयसिसबरोबर केली आहे. यावरून त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -