घरक्रीडाInd Vs NZ 2nd test : कोच द्रविड यांच्या मार्गावर कोहलीचा संघ;...

Ind Vs NZ 2nd test : कोच द्रविड यांच्या मार्गावर कोहलीचा संघ; वानखेडेच्या क्युरेटरला दिले ३५ हजार रूपये

Subscribe

भारतीय संघाने मुंबईतील कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर वानखेडे मैदानाच्या क्युरेटरला ३५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली आहे

भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात एक नवीन परंपरा सुरू होताना दिसत आहे. भारतीय संघाने मुंबईतील कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर वानखेडे मैदानाच्या क्युरेटरला ३५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. भारतीय संघाने मुंबईच्या मैदानाची खेळपट्टी अधिक चांगली करण्यासाठी ही भेट दिली आहे. यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कानपूर कसोटी सामन्यानंतर ग्रीन पार्क मैदानावरील स्टाफला देखील खेळपट्टीत सुधारणा करण्यासाठी ३५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली होती. कानपूरमधील कसोटी सामना पाचव्या दिवसीाच्या शेवटच्या षटकापर्यंत चालला होता. तर मुंबईतील सामना चार दिवसात संपला.

भारतीय संघाने सोमवारी मुंबई कसोटी सामन्यांत न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. हा विजय सर्वाधिक धावांच्या बाबतीत भारतीय संघाच्या कसोटी इतिहासातील सर्वोत्कृष्ट विजय ठरला. दरम्यान, कानपूरमधील सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला होता आणि त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाला सामना अनिर्णित करण्यात यश आले होते.

- Advertisement -

राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक पदाचा कारभार स्विकारल्यानंतर भारतीय संघात खूप बदल होताना दिसत आहेत. जेव्हा कोणता खेळाडू भारतीय संघात पदार्पण करतो तेव्हा द्रविड कोणत्यातरी माजी क्रिकेटर कडूनच त्या खेळाडूला भारतीय संघाची कॅप प्रदान करतात. यापूर्वी असे संघाचा कर्णधार, प्रशिक्षक किंवा संघाचा कोणताही उपस्थित खेळाडू करत होता. टी-२० विश्वचषकानंतर सुरू झालेल्या या दौऱ्यात न्यूझीलंडने ३ टी-२० सामने खेळले आहेत आणि तिनही सामने गमावले. तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत देखील न्यूझीलंडला १-० असा पराभव पत्करावा लागला.


हे ही वाचा : http://IND vs NZ Test Series : अक्षर-पटेल आणि रवींद्र-जडेजा यांच्यापासून बनलेले चार भारत-न्यूझीलंड खेळाडू; ICC ने केला फोटो शेयर

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -