घरक्रीडाभारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

Subscribe

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १ डाव १३७ धावांनी मात केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बाजी मारली आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या कसोटीमध्ये देखील २-० अशी विजयी आघाडी मिळवली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामना होणार आहेत. यापैकी दोन सामन्यांमध्ये जो संघ विजेता ठरेल तो कसोटी सामन्यांच्या मालिकेचा विजेता ठरणार होता. अखेर भारताने पहिल्या दोन सामन्यांत घवघवीत यश मिळवत कसोटीच्या मालिकेवर भारताचे नाव कोरले आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी मात केली आहे. पुण्याच्या गहुंजे येथे हा सामना खेळला गेला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली. विशेष म्हणजे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. कर्णधार विराट कोहलीचा हाच निर्णय सत्कारणी ठरला. हिटमॅन रोहित शर्मा वगळता सर्वच फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने ६०१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. भारतीय संघाचे हे कडवे आव्हान घेऊन आफ्रिकेचे फलंदाज मैदानावर उतरले. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ते टिकाव धरु शकले नाहीत. अवघ्या २७५ धावांवर आफ्रिकेचा पहिला डाव आटोपला. चौथ्या दिवशी भारतीय संघाने आफ्रिकेला फॉलो ऑनचा इशारा दिला. त्यानुसार आफ्रिकेचा संघ पुन्हा मैदानावर आला. मात्र, दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ फक्त १८९ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाचा १ डाव १३७ धावांनी विजय झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -