घरक्रीडाInd vs WI : विराटचे २४ वे शतक, रिषभ पंतचे शतक थोडक्यात...

Ind vs WI : विराटचे २४ वे शतक, रिषभ पंतचे शतक थोडक्यात हुकले

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये सध्या राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भराताची घोडदौड सुरूच आहे. काल सलामीवीर पृथ्वी शॉच्या शतकानंतर आज कर्णधार विराट कोहलीनेदेखील शतक साजरे केले. विराटचे त्याच्या कसोटी कारकिर्दीतले हे २४ वे शतक ठरले. २४ वे शतक करुन विराटने वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर व्हिव रिचर्ड्स आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटर व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराट कोहलीबरोबरच रिषभ पंतने देखील शानदार खेळी साकारली. परंतु रिषभला शतक पूर्ण करता आले नाही. ८४ चेंडूत त्याने जलद ९२ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ उत्तूंग षटकार लगावले.

- Advertisement -

विराटच्या भारतात ३००० कसोटी धावा पूर्ण

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर खेळताना ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने भारतात खेळलेल्या ३३ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत १० शतके झळकावली आहेत. त्यामध्ये ५ द्विशतकांचा समावेश आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर विराटची सरासरी ६५ पेक्षा अधिक आहे.

- Advertisement -

एका वर्षात विराटच्या १००० धावा पूर्ण

विराटने यंदाच्या कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात १००० धावा पूर्ण करण्याची हॅट्रीक केली आहे. विराटने यावर्षी ९ कसोटींत ५९.४३ च्या सरासरीने १००३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये तीन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

सचिनने केले कौतुक

विराटने शतक साजरे केल्यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने ट्विटरवरुन विराटचे कौतुक केले. सचिन म्हणाला शतक करण्याची सवय चांगली आहे, ती तशीच राहु दे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -