घरक्रीडाINDW vs BANW : दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशचा उडवला...

INDW vs BANW : दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशचा उडवला धुव्वा, 8 धावांनी पराभव

Subscribe

भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने सात विकेटने विजय मिळवला होता. परंतु भारतीय महिला संघासाठी कर्णधार हरमनप्रीतने आजच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा बांगलादेशचा पराभव करत 8 धावांनी मात केली आहे. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 95 धावापर्यंत मजल मारली होती. परंतु दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचा संघ 87 धावांत गारद झाला.

भारतीय संघासाठी दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. तर मिन्नू मणीने 2 विकेट घेण्याचा पराक्रम केला. भारताने दिलेल्या 96 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात खराब झाली. मुर्शिदा खातूनने 15 चेंडूचा सामना करताना फक्त 4 धावा केल्या. तसेच रितू मोनीने 6 चेंडूत 4 धावा केल्या. शोरना अख्तरने 17 चेंडूत सात धावा केल्या. कर्णधार निगर सुल्तानाने एकाकी झुंज दिली. सुल्तानाने 38 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

- Advertisement -

दिप्ती शर्मा हिने बांगलादेशची कर्णधार तुल्तानाला बाद केले. फहिमा खातून आणि मारूफा अख्तर यांना खातेही उघडता आले नाही. दिप्तीने चार षट्कार 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. शेफालीने 3 षटकात 15 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या.

- Advertisement -

भारतीय महिला संघाने 9 जुलैला बांगलादेशचा धुव्वा उडवला होता. ट्वेंटी-20 मालिकेत विजयी सलामी दिली होती. या विजयासह हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान बांगलादेशच्या संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे बांगलादेशचा संघ 20 ओव्हर्समध्ये 5 बाद केवळ 114 धावा करू शकला. 115 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सहज लक्ष पूर्ण केलं होतं.


हेही वाचा : INDW Vs BANW 2023: भारतीय महिलांनी बांगलादेशचा उडवला धुव्वा; 1-0 अशी आघाडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -