घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील कटकारस्थानांना सडेतोड उत्तर देऊ, दिल्लीतील बैठकीत काँग्रेस नेत्यांचा निर्धार

महाराष्ट्रातील कटकारस्थानांना सडेतोड उत्तर देऊ, दिल्लीतील बैठकीत काँग्रेस नेत्यांचा निर्धार

Subscribe

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ होत आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे वाहून या पक्षातही मोठी फूट पडली. महाविकास आघाडीतील आता केवळ काँग्रेसच या फुटीच्या शापातून बचावली आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात राज्यातील बडे नेते सहभागी झाले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

- Advertisement -

महाराष्ट्रात गेल्यावर्षी जून महिन्यात शिवसेने बंड झाले आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपाला सोबत घेत शिवसेनेच्या फुटीर गटाने सरकार स्थापन केले. त्यानंतर वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही तसे काही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली.

हेही वाचा – रात्रीस चर्चा चाले? अजित पवारांच्या अनुपस्थितीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खलबतं

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक झाली. यासंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट केले आहे. भाजपाने आपल्या ‘वॉशिंग मशीन’चा वापर करून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. या राजकीय कटकारस्थानांना काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देईल. भाजपाकडून जनादेशावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड राजकीय उत्तर देईल. महाराष्ट्रातील जनतेला आमचे नेते आणि कार्यकर्ते त्यांचे सरकार परत मिळवून देतील. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही आमचे स्थान नेहमीच टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेस यांच्यातील वैभवशाली नाते आम्ही आणखी दृढ करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीनंतर सोशल मीडियावर याबद्दलचे मत व्यक्त केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि तिथे काँग्रेस पक्ष मजबूत करणे तसेच जनतेचा आवाज बुलंद करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. या जनविरोधी सरकारचा पराभव करण्यावर आमचा भर राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -