भारताचे न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

भारताचा इंग्लंड दौरा सध्या सुरू असून आता भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रकही न्यूझीलंड क्रिकेटकडून जाहीर करण्यात आले आहे. यात पाच एकदिवसीय तर तीन टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे.

india tour of new zealand 2019
भारत विरूद्ध न्यूझीलंड

भारतीय क्रिकेटसाठी पुढील वर्षाची सुरूवात ही न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारताचा संघ २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या या दौऱ्यात ५ एकदिवसीय तर ३ टी-२० सामन्यांचा समावेश असणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

असा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा

२०१९ च्या सुरूवातीलाच भारताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार असून न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सॅन्टनर याने न्यूझीलंड क्रिकेटच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एका व्हिडिओद्वारे भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारतविरूद्ध न्यूझीलंड पाच एकदिवसीय सामने –

  • पहिला एकदिवसीय सामना – २३ जानेवारी २०१९
  • दुसरा एकदिवसीय सामना – २६ जानेवारी २०१९
  • तिसरा एकदिवसीय सामना – २८ जानेवारी २०१९
  • चौथा एकदिवसीय सामना – ३१ जानेवारी २०१९
  • पाचवा एकदिवसीय सामना – ३ फेब्रुवारी २०१९

 

भारतविरूद्ध न्यूझीलंड तीन टी-२० सामने –

  • पहिली टी-२० सामना : ६ फेब्रुवारी २०१९
  • दुसरी टी-२० सामना : ८ फेब्रुवारी २०१९
  • तिसरी टी-२० सामना : १० फेब्रुवारी २०१९