घरक्रीडाIND vs ENG : रोहित शर्माचे इंग्लंडमध्ये पहिले अर्धशतक, कसोटी पदार्पणाच्या तब्बल...

IND vs ENG : रोहित शर्माचे इंग्लंडमध्ये पहिले अर्धशतक, कसोटी पदार्पणाच्या तब्बल आठ वर्षांनंतर!

Subscribe

रोहितने कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंड या सामन्यासाठी पाच प्रमुख गोलंदाजांना संघात स्थान दिले. परंतु, ढगाळ वातावरणाचा इंग्लिश गोलंदाजांना फायदा करून घेता आला नाही. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी सुरुवातीपासूनच उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडला विकेट घेण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. राहुलने संयमाने फलंदाजी केली, तर रोहित आक्रमक शैलीत खेळताना दिसला. रोहितने ८३ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. तसेच २०१३ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचे इंग्लंडमधील हे पहिले कसोटी अर्धशतक ठरले.

८३ चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने अर्धशतक

रोहितला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, ३६ धावांवर तो बाद झाला होता. दुसऱ्या कसोटीत मात्र त्याने पुन्हा ही चूक केली नाही. चांगली सुरुवात मिळाल्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ८३ चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केले. त्याने विशेषतः डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करनविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. त्याने पहिले सहा चौकार करनच्याच गोलंदाजीवर मारले.

यंदा रोहितला पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळत आहे. या संधीचा त्याने पहिल्या दोन कसोटीत चांगला वापर केला आहे. तसेच त्याला राहुलची अप्रतिम साथ लाभली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३० षटकांनंतर भारताची बिनबाद ९१ अशी धावसंख्या होती. रोहित आणि राहुलच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळाले नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -