घरक्रीडाकृणाल पांड्याच्या संपर्कातील त्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला, भारताला दिलासा?

कृणाल पांड्याच्या संपर्कातील त्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट आला, भारताला दिलासा?

Subscribe

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याचं मंगळवारी समोर आलं. त्यामुळे त्याच्या संपर्कात जे खेळाडू आले त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, या आठ खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आला असून भारताला दिलासा देणारा हा अहवाल आहे. कृणाल पांड्याच्या संपर्कात असलेल्या आठ भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मंगळवारी कृणालचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे दोन्ही संघांना क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आलं आणि भारतीय खेळाडूंची आरटी-पीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी होणारा दुसरा टी-२० सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, कृणाल पांड्याच्या संपर्कात हार्दिक पांड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गौतम आणि देवदत्त पडिक्कल हे खेळाडू आले होते. यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना २७ जुलैला खेळला जाणार होता. परंतु, हा सामना एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून बुधवारी २८ जुलैला पार पडेल.

- Advertisement -

विराटला दिलासा

इंग्लंड दौर्‍यावर गेलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या बातमीमुळे दिलासा मिळाला आहे. कारण पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहेत. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे कसोटी मालिकेबाहेर व्हावे लागले. पृथ्वी आणि सूर्यकुमार यांनी इंग्लंड दौर्‍यावर जाण्यासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह येणं खूप महत्वाचं होतं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -