घरक्रीडाराष्ट्रकुल स्पर्धेत १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाची 'सुवर्ण' कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाची ‘सुवर्ण’ कामगिरी

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडू सातत्याने आक्रमक खेळी करताना दिसत आहेत. नुकताच भारताचा १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडू सातत्याने आक्रमक खेळी करताना दिसत आहेत. नुकताच भारताचा १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारताला हे दुसरे सुवर्ण पदक मिळाले आहे. (Indian weightlifter Jeremy Lalrinnunga wins Gold in Men 67kg finals)

१९ वर्षीय वेटलिफ्टरने पुरूषांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. लालरिननुंगा ३०० (१४० अधिक १६० किलो) वजन उचलून इतिहास रचला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील संकेत सरगरने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. तसेच, भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पाच पदके पटकावली आहेत.

- Advertisement -

ही सर्व पदके वेटलिफ्टिंग मधून मिळाली आहेत. भारताने आतापर्यंत २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. भारतीय खेळाडू जेरेमी लालरिनुंगा आणि मिराबाई चानू यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे.

विशेष म्हणजे जेरेमीने ४ वर्षांमध्ये सलग तिसऱ्यांदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जेरेमीने २०१८ मध्ये युवा ऑलिम्पिकमध्ये पदकाशिवाय मागील वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकले होते. आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून देखील त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील संकेत सरगरने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे. संकेत सरगरने रौप्य पदक आणि गुरूराजा पुजारीने ६१ किलो वजन श्रेणीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तसेच बिंगियारानी देवीने रौप्य पदक जिंकले आहे.


हेही वाचा – सांगलीच्या संकेतला सरकारकडून 30 लाखांचे बक्षीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -