घरदेश-विदेशकर्जबुडव्या विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

कर्जबुडव्या विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

Subscribe

विजय मल्ल्याने प्रत्यार्पणाविरोधात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे.

भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय मल्ल्याने भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ही याचिका इंग्लंडच्या कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मल्ल्याला भारतात आण्यासाठी आता कोणत्याही अडचणी येणार नाहीत. लंडनच्या वेस्टमिस्टर कोर्टाने डिसेंबरमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली होती. फेब्रुवारीमध्ये यूकेच्या गृहविभागाने देखील मंजूरी दिली होती. त्यानंतर विजय मल्ल्याने प्रत्यार्पण करण्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश

किंगफिशियरचा मालक विजय मल्ल्याने भारतातील बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावला होता. कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लडमध्ये पसार झाला. भारतीय तपास यंत्रणांनी विजय मल्ल्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर तपास भारताने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. याप्रकरणाची सुनावणी लंडनमधील कोर्टात सुरु होती. दरम्यान, विजय मल्ल्याने प्रत्यार्पणाविरोधात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली त्यामुळे भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. लवकरच विजय मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण केले जाणार आहे.

भारतीय बँकांना ९००० कोटींचा चूना

कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, फेमाचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. मल्ल्याने भारतीय बँकांकडून ९००० कोटींची कर्ज घेतले होते. मल्ल्याच्या किंगफिशियर एअरलाईन्सने बँकांकडून कर्ज घेतले होते. विजय मल्ल्या २०१६ मध्ये भारत सोडून लंडनमध्ये पसार झाला. मुंबईचे विशेष न्यायालय (पीएमएलए) त्याला फरार घोषित केले होते. ईडीने आतापर्यंत विजय मल्ल्याच्या देश-विदेशातील संपत्ती जप्त केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे शेअर विकून १००८ कोटी वसूल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -