घरक्रीडाIPL 2020 : या कारणामुळे मयंती लँगर करणार नाही आहे अँकरिंग

IPL 2020 : या कारणामुळे मयंती लँगर करणार नाही आहे अँकरिंग

Subscribe

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) मोसमाला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात सुरु झालेल्या स्पर्धेत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भज्जी-रैनाच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई सुपर किंग्ज तसेच क्रिकेटच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. शिवाय, प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर (Mayanti Langer) आयीपीएलच्या या हंगामात नसणार आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट रसिकांना धक्का बसला आहे. आयपीएलसाठी अँकर आणि कॉमेंटरी पॅनेलची घोषणा देखील करण्यात आली. परंतु मयंती लँगर या पॅनेलचा भाग नाही आहे. यावरुन बऱ्याच चर्चा सुरु होत्या. मात्र, यामागील कारण स्वत: मयंती लँगरने दिलं आहे.

क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगरने यावर्षी आयपीएलमध्ये अँकर म्हणून का नसणार आहे याबद्दल सोशल मीडियावरून सांगितलं आहे. मयंती लँगरने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. मयंतीने ट्विटरवर स्टुअर्ट बिन्नी आणि तिच्या मुलासमवेत एक फोटो शेअर केला आहे. तुमच्यातील काहीजण मुख्य कारण ओळखू शकले, बाकिचे अनुमान लावत राहिले. स्टार स्पोर्ट्सने मला मोठ्या कार्यक्रमांमध्ये काम करण्याची संधी दिली. मी जेव्हा गरोदर होते, तेव्हा मला गरज होती, तेव्हा मला त्यांनी साथ दिली, असं मयंती लँगरने म्हटलं आहे.

- Advertisement -

मयंतीने पुढे लिहिलं आहे की, “यावेळी मी आयपीएल पाहण्याचा आनंद घेईन. ऑल द बेस्ट टू जतीन सप्रू, सुहेल चांधोक, आकाश चोप्रा, संजना गणेशन, डीन जोन्स, स्कॉट स्टायरिस, ब्रेट ली, संजोग गुप्ता.” विशेष म्हणजे यावर्षी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनाही कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -