घरक्रीडाIPL 2021 : आयपीएलचा उर्वरित मोसम युएईत? ‘या’ तारखेस स्पर्धेला पुन्हा सुरुवात...

IPL 2021 : आयपीएलचा उर्वरित मोसम युएईत? ‘या’ तारखेस स्पर्धेला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता

Subscribe

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अजून ३१ सामने शिल्लक आहेत. 

कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. मात्र, हा मोसम स्थगित करण्यात आला असून रद्द झालेला नाही, असे त्यावेळी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते. आता आयपीएलचा उर्वरित मोसम युएईत होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेला १८ किंवा १९ सप्टेंबर रोजी पुन्हा सुरुवात होईल आणि ही स्पर्धा साधारण तीन आठवडे चालेल. तसेच अंतिम सामना ९ किंवा १० ऑक्टोबरला खेळला जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

१० डबल हेडर

बीसीसीआयने सर्वांसोबत चर्चा केली आहे. आयपीएल स्पर्धेला १८ ते २० सप्टेंबर दरम्यान पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. १८ सप्टेंबरला शनिवार, तर १९ सप्टेंबरला रविवार आहे. त्यामुळे या दोनपैकी एका दिवशी आयपीएल मोसमाला पुन्हा सुरुवात होऊ शकेल. ९ किंवा १० ऑक्टोबरला अंतिम सामना होईल. तसेच १० डबल हेडर (एकाच दिवशी दुपारी आणि रात्री सामने) असतील, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

४ मे रोजी मोसम स्थगित

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात चिंताजनक परिस्थिती असतानाही आयपीएलचा यंदाचा मोसम बायो-बबलमध्ये सुरक्षितरित्या पार पडेल असा बीसीसीआयला विश्वास होता. परंतु, त्यांचा हा विश्वास फोल ठरला. कोरोनाने बायो-बबलमध्ये शिरकाव केला. काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने ४ मे रोजी आयपीएलचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्याआधी ६० पैकी केवळ २९ सामनेच झाले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -