घरक्रीडा२२ वर्षीय अनुज रावत ठरला 'आरसीबी'च्या विजयाचा हिरो; 'मुंबई'चा पराभव करणारा हा...

२२ वर्षीय अनुज रावत ठरला ‘आरसीबी’च्या विजयाचा हिरो; ‘मुंबई’चा पराभव करणारा हा खेळाडू आहे तरी कोण?

Subscribe

आयपीएलच्या १८व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सात विकेट्स राखून मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. या पराभवासह मुंबईनं सलग चौथा सामना गमवला आहे. मात्र, या सामन्यात मुंबईला परभूत करण्याच महत्वाचा वाटा असणाऱ्या २२ वर्षीय अनुज रावतची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) २०२२च्या १५ व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत विजयाचा नारळ फोडलेला नाही. आयपीएलच्या १८व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं सात विकेट्स राखून मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. या पराभवासह मुंबईनं सलग चौथा सामना गमवला आहे. मात्र, या सामन्यात मुंबईला परभूत करण्याच महत्वाचा वाटा असणाऱ्या २२ वर्षीय अनुज रावतची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. कोण आहे हा अनुज रावत?, आधी कोणत्या संघात खेळायचा? कुठे राहणारा आहे? असे सवाल सध्या क्रिकेटप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. तर चला जाणून घेऊयात हा अनुज रावत आहे तरी कोण?

मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरुच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघानं सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोदावर बंगळुरूसमोर १५२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघानं ९ चेंडू शिल्लक ठेवत हे लक्ष्य पूर्ण केलं.

- Advertisement -

बंगळुरूच्या विजयाचा हिरो २२ वर्षीय सलमीवीर अनुज रावत ठरला. अनुज रावतनं ४७ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांसह ६६ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळं सध्या सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे. यंदाच्या आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबीनं अनुजला ३.४० कोटींना खरेदी केलं होतं. त्याची बेस प्राईस २० लाख रुपये होती. अनुजसाठी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सनं देखील बोली लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by RCB 12th Man Army (@rcbfans.official)

अनुज गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता आणि तेव्हा त्याला फक्त दोन सामन्यात संधी मिळाली होती. अनुजची स्टोरी ही भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि दिल्ली कपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत याशी मिळती-जुळती आहे.

- Advertisement -

अनुज हा मुळचा नैनीताल जिल्ह्यातील रामनगर या गावचा आहे. क्रिकेटपटू होण्यासाठी त्यानं १०व्या वर्षी दिल्ली गाठली. पंत प्रमाणेच अनुज एक आक्रमक विकेटकीपर आणि फलंदाज आहे. विशेष म्हणजे त्याला षटकार मारण्यास फार आवडते. अनुज रावतचे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहणी आहे. अनुजने आई-वडिलांना क्रिकेटमध्ये करिअर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर वडिलांनी रामनगरमध्ये क्रिकेटच्या सुविधा आणि अकादमी नसल्यानं त्याला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ANUJ RAWAT (@anujrawat_1755)

२०१६-१७ साली दिल्लीच्या १९ वर्षाखालील संघात त्याची निवड झाली. भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून तो आशिया कप देखील खेळला आहे. ऑक्टोबर २०१७ साली त्याने रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी चांगली होत गेली.

  • सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत अनुजनं ५ डावात १५ चौकार आणि १० षटकार मारले होते.
  • २०२१-२२च्या विजय हजारे ट्रॉफीत रावतने ५८.३३च्या रासरीने आणि १०८.६९च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा अनुजच होता.
  • रणजीमध्ये पहिल्या दोन सामन्यात अर्धशतक करणाऱ्या अनुजनं डिसेंबर २०१८ मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध १३४ धावांची खेळी केली. त्याने आतापर्यंत ३१ टी-२०, २२ प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मध्ये २० सामने खेळले आहेत.
  • लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर ५७३, फर्स्ट क्लासमध्ये ९५४ तर टी-२० मध्ये ६१४ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – World Squash: दिनेश कार्तिकची बायको दीपिका पल्लीकलचे दमदार पुनरागमन; 2 सुवर्णपदके जिंकत वाढवली भारताची शान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -